राजकीय परिस्थितीवर बाळासाहेब थोरातांची सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा

सत्तास्थापनेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग 

Updated: Nov 11, 2019, 09:48 AM IST
राजकीय परिस्थितीवर बाळासाहेब थोरातांची सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा title=

मुंबई : सत्तास्थापनेच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी फोनवरून चर्चा केली आहे. या चर्चेत त्यांनी महाराष्ट्रतल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी यावेळी काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशीही चर्चा केली. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाब काँग्रेसमध्येही जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार आहेत. पण हे पहिल्यांदाच झालंय असं नाही. औरंगाबाद जिल्हा परिषदेत या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं आहे. औरंगाबादमध्ये अशीच महाशिव आघाडी घडवून आली होती. 

राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आज राज्यपालांना भेटून ही यादी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या ५६ आमदारांसह ८ अपक्ष आमदारही शिवसेनेच्या यादीत असणार आहेत. ज्यांनी याआधीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तर आधी एनडीएतून बाहेर पडावं, भाजपशी नातं तोडावं मग शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा विचार करु अशी भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. या साऱ्या प्रकरणात काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची आहे. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये असून ते हायकमांडच्या आदेशांची वाट पाहत आहेत.