Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?

Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

सायली पाटील | Updated: Jun 17, 2024, 08:58 AM IST
Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?  title=
bakri eid 2024 Pune news traffic changes in pune city golibar maidan chowk

Pune traffic changes : (Bakri Eid 2024) बकरी ईदनिमित्त पुण्यातील गोळीबार चौक परिसरात वाहतुकीत सोमवारी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामुळं येथील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणूनच गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक या मार्गावरून वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आली आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

बकरी ईदच्या निमित्तानं पुण्यातील गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून, वाहन चालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौकातून उजव्या दिशेला वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जाण्याचा सल्ला यंत्रणेनं दिला आहे. 

हेसुद्धा वाचा : 'कुछ बडा होने वाला है'; अमित शाह, डोवाल यांच्या बैठकीनंतर Jammu Kashmir मध्ये 'झिरो टेरर प्लॅन' लागू 

पुण्याच्या वाहतूक मार्गांमधील बदल 

  • सोलापूर रस्त्यानं गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपियर रस्त्यामार्गे सीडीओ चौकातून वळवण्यात आलीय. 
  • कोंढवा परिसरातून येणारी वाहतूक एम्प्रेस गार्डन, लुल्लानगरच्या दिशेनं जाईल. 
  • सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौक या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला. 
  • कोंढवामार्गे येणाऱ्या वाहनांना खटाव बंगला चौक, मम्मादेवी चौक, वानवडी बाजार, भैरोबा नाला दिशेनं जाण्याची व्यवस्था. 
  • सीडीओ चौक ते गोळीबार मैदानमार्गानं जाणारा रस्ता सकाळी 6 ते 10 दरम्यान बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.