जळगावात मध्यान्ह भोजन पोषण आहार निकृष्ट

जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात दिला जाणार पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे तपासात उघड.

Updated: Jul 4, 2017, 08:53 AM IST
 title=

जळगाव : जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात दिला जाणार पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे तपासात उघड.

मध्यान्ह भोजनात दिला जाणार पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या एका महिला सदस्यांनी केली. यानंतर प्रशासनानं जिल्हा परिषदेत तपासनी केली असता आहार निकृष्ट आढळून आला. मात्र गोदामात तपासनी केली असता पोषण आहार चांगल्या दर्जाचं असल्याचं दिसून आलंय.

संपूर्ण जिल्ह्यात पोषण आहार पुरवठ्याचं कंत्राट हे साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून पोषण आहार पुरवठा करताना अनेक नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केलाय.