धुळे बस स्थानकाची दुरावस्था; धूर, धुळ, कचऱ्याचं साम्राज्य

धुळे स्थानक समस्यांचं आगार...

Updated: Feb 4, 2020, 08:41 PM IST
धुळे बस स्थानकाची दुरावस्था; धूर, धुळ, कचऱ्याचं साम्राज्य title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे स्थानक अक्षरशः समस्यांचं आगार झालं आहे. धूर, धुळं, कचरा आणि खड्डे अशा समस्यांनी धुळे बस आगार वेढलं गेलंय. 

पर्यावरण आणि परिवहनचे तीन तेरा कसे वाजतात हे आपल्याला अनुभवायचं असेल तर धुळे बस स्थानक उत्तम उदाहरण आहे. धुळीचं साम्राज्य असलेलं हे बस स्थानक, धूर ओकणाऱ्या बसेस. डांबरीकरणाचा अंश नसलेले फलाट. तोंडाला फडकं लावून फिरणारे प्रवासी हे धुळ्यातलं नेहमीचं चित्र आहे.

धुळे बस आगार या खान्देशातील सर्वात मोठं आगार आहे. याच बस स्थानकातून मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात महाराष्ट्रातील प्रवाश्यांना जाता येतं. मात्र या बस स्थाकांशी दूरवस्था झाली आहे. 

धुळे स्थानक मॉडेल बस स्थानक करण्याची सिंहगर्जना तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. मात्र मॉडेल बसस्थानक वगैरे जाऊ दे साध्या सुविधाही इथे नाहीत. आता शिवशाही अवतरल्याचा टेंभा मिरवणाऱ्या राज्य सरकारने धुळे स्थानकाबाबत दिलेलं वचन पूर्ण करावं.

  

आताच्या हेडलाईन्स

'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे

हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...

World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल

वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर

'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

सेलिब्रिटींची मजेशीर टोपण नावं माहितीयेत का?