विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी औरंगाबादच्या कॉलेजमध्ये मोबाईल बंदी

महाविद्यालयाने आपलं कॅम्पस मोबाईल मुक्त केलं आहे.

Updated: Feb 4, 2020, 07:40 PM IST
विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी औरंगाबादच्या कॉलेजमध्ये मोबाईल बंदी title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : तुमची मुलं मोबाईल वेडी असतील तर ही बातमी महत्त्वाची आहे. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं असल्याचा दावा करत औरंगाबादमधल्या रफीक झकेरिया महिला महाविद्यालयाने आपलं कॅम्पस मोबाईल मुक्त केलं आहे.

औरंगाबादच्या रफिक झकेरीया महिला महाविद्यालयानं शिक्षणाच्या दृष्टीने मोबाईल भस्मासूर ठरत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. नुसताच निष्कर्ष काढून हे महाविद्यालय गप्प बसलं नाही तर प्राचार्यांनी महाविद्यालय कॅम्पस मोबाईल मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

मोबाईल बॅनच्या निर्णयानंतर विद्यार्थीनींनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. तर या निर्णयानंतर विद्यार्थीनींची शिक्षणातील एकाग्रता वाढल्याचं शिक्षक सांगताय.
 
महाविद्यालयाच्या गेटवरच मुलींकडे मोबाईल आहे का नाही याची तपासणी केली जाते. त्यांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यात येतात, आणि जातांना ते परत देण्यात येतात. इतकंच नाही तर आवश्यकतेनुसार घरच्यांशी संपर्क करायचा असेल तर महाविद्यालयाने एक खास मोबाईल सेवाही उपलब्ध करून दिली आहे. आणि हा मोबाईल नंबर पालकांसोबतही शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे जर कोणत्याही तंत्रज्ञानाचा विकासात अडथळा येत असेल, तर महाविद्यालयाने वापरलेली अशी शक्कल नक्कीच कौतुकास्पद आहे.

  

आताच्या हेडलाईन्स

'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे

हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...

World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल

वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर

'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

सेलिब्रिटींची मजेशीर टोपण नावं माहितीयेत का?