''फोनवर बोलली नाही, मॅसेजला ब्लॉक केलं...आता तुला....''

 पीडितेत्या आईने मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली तेव्हा सचिन लिपणे याला रविवारी 7 मार्चला मुकुंदवाडी पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

Updated: Mar 10, 2021, 02:39 PM IST
''फोनवर बोलली नाही, मॅसेजला ब्लॉक केलं...आता तुला....'' title=

औरंगाबाद : आजकाल काही नराधमांची मजल इथपर्यंत पोहचली आहे की, ते त्यांना हवं ते करुन घेतात आणि त्यांचे नाही ऐकले की ते कुठल्याही थराला पोहोचतात. अशीच एक धक्कादायक घटना औरंगाबाद येथील मुकुंदवाडी येथे घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला तू माझ्याशी फोनवर बोलली नाहीस,  message केला नाहीस किंवा तुझे फोटो पाठवले नाहीस, तर तुझ्यावर प्राणघातक हल्ला करेन, अशी धमकी एका नराधमाने दिली.

सचिन बाबासाहेब लिपणे हा नराधम मुकुंदवाडीतील प्रकाशनगरमध्ये राहतो. आपल्या मुलीला त्याने धमकी दिली, अशी फिर्याद पीडितेत्या आईने मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. सचिन लिपणे याला रविवारी 7 मार्चला मुकुंदवाडी पोलीसांनी बेड्या ठोकल्या.

लिपणेला मंगळवार दि.९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी दिले. पीडितेच्या वाढदिवसा दिवशी सचिन लिपणे याने पीडिते सह तिच्या मैत्रीणींना पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने पीडितेसोबत फोटो काढले होते. आणि त्याच फोटोंची धमकी देऊन आरोपी तिच्याशी फोनवर बोलत आणि चॅंटींग करत होता.

पण जेव्हा पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केले तेव्हा आरोपीने जाळून टाकीन अशी धमकी दिली. ही सर्व घटना पीडित मुलीने आपल्या आईला सांगितले असता, तिच्या आईने या बद्दलची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली.

पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयात हजर तेव्हा सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी गुन्हा संवेदनशील असल्याने आरोपीचा मोबाईल जप्त केला.  पुढील चौकशीसाठी आरोपीला पोलिसकोठडी सुनावली.