प्रियाशरण महाराज यांना आश्रमात घुसून मारहाण

औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) चौका ते लाडसावंगी मार्गावरील आश्रमात सात ते आठ जण घुसले.   

Updated: Nov 12, 2020, 10:58 AM IST
प्रियाशरण महाराज यांना आश्रमात घुसून मारहाण  title=

औरंगाबाद : जिल्ह्यातील (Aurangabad) चौका ते लाडसावंगी मार्गावरील आश्रमात सात ते आठ जण घुसले. यावेळी आश्रमात राहत असलेल्या प्रियाशरण महाराज ( Priyasharan Maharaj) यांना या लोकांनी मारहाण (Beaten) केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीला घडली असून या घटनेप्रकरणी फुलंब्री पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

चौका पासून तीन किमी अंतरावर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियाशरण महाराज यांचा आश्रम आहे. हा आश्रम भव्य अशा इमारतीत आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात सात ते आठ व्यक्ती दाखल झाल्या. त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आश्रमात प्रवेश केला.

महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर या लोकांनी वरच्या मजल्यावर जात महाराज यांना मारहाण केली. यात महाराज आणि अज्ञात लोकामध्ये झटापट झाली. त्यामध्ये प्रियाशरण महाराज यांच्या डाव्या हाताला चाकूने वार केला गेला. यात ते जखमी झालेत. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.