मुलीच्या धैर्याची कमाल! अपहरणाचा प्रयत्न हूशारीनं लावला उधळून...

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु आपल्या हूशारीनं तिनं अपहरणाचा प्लॅन उधळवून लावल्या आहेत. या मुलीचं वय फक्त 9 वर्षे आहे. ही बातमी प्रत्येक मुलीनं वाचलीच पाहिजे. 

Updated: Nov 26, 2022, 08:21 PM IST
मुलीच्या धैर्याची कमाल! अपहरणाचा प्रयत्न हूशारीनं लावला उधळून...

विशाल करोळे, झी मीडिया, औंरगाबाद : आजकाल अनेक ठिकाणी अपहरणाच्या बातम्या वाढलेल्या दिसत आहेत. त्यातून मुलींच्या अपहरणांमध्येही (Kidnapping) वाढ होताना दिसते आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना (shocking news) समोर आली आहे. परंतु आपल्या हूशारीनं तिनं अपहरणाचा प्लॅन उधळवून लावल्या आहेत. या मुलीचं वय फक्त 9 वर्षे आहे. ही बातमी प्रत्येक मुलीनं वाचलीच पाहिजे. अशी वेळ आपल्यावर येऊ नये परंतु अशा कठीण प्रसंगी आपण काय करावे याच उत्तम उदाहरण म्हणून तुम्ही ही बातमी (crime news) वाचण्यासाठी आहे. (aurangabad news girl escapes from kidnapping attempt)

औरंगाबाद (aurangabad) शहरात एका नऊ वर्षांच्या मुलीने स्वत:च्या अपहरणाचा डाव हाणून पाडला. ही घटना औरंगाबादच्या जिगीषा इंटरनॅशनल शाळेतील आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात (police) गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने एका नऊ वर्षांच्या मुलीला नावाने हाक मारीत तुला घेण्यासाठी पप्पांनी पाठवले आहे, तू माझ्यासोबत चल म्हणाला. त्यावर त्या चिमुकल्या मुलीने तुम्हाला ओळखत नाही. मला घेण्यासाठी पप्पा नव्हे तर आई येते, असे सांगितले. त्यानंतरही त्या व्यक्तीने  तू पप्पांना फोनवर बोल म्हणून फोन लावला. फोनवर बोलल्यानंतर त्या मुलीने हा माझ्या पप्पांचा नंबर नाही अन् आवाजही त्यांचा नाही'', असे म्हणून शाळेच्या गेटकडे धाव घेतली. त्यामुळे मुलीच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. मुलगी गेटमध्ये परत आल्यामुळे गेटवरील दोन महिलांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने अनोळखी इसम घेऊन जात होता, म्हणून परत आल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी मानसीच्या पालकांना बोलावले. मुलीच्या वडिलांनी सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार (kidnapping aurangabad) अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. 

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

कशी सुटली मुलगी? 

संभाजी नगर  शहरात एका नऊ वर्षांच्या मुलीने स्वत:च्या अपहरणाचा डाव हाणून पाडला. ही घटना औरंगाबादच्या जिगीषा इंटरनॅशनल (international school) शाळेतील आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळा सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने एका नऊ वर्षांच्या मुलीला नावाने हाक मारीत तुला घेण्यासाठी पप्पांनी पाठवले आहे, तू माझ्यासोबत चल म्हणाला. त्यावर त्या चिमुकल्या मुलीने तुम्हाला ओळखत नाही. मला घेण्यासाठी पप्पा नव्हे तर आई येते, असे सांगितले. त्यानंतरही त्या व्यक्तीने तू पप्पांना फोनवर बोल म्हणून फोन लावला. फोनवर बोलल्यानंतर त्या मुलीने हा माझ्या पप्पांचा नंबर नाही अन् आवाजही त्यांचा नाही'', असे म्हणून शाळेच्या गेटकडे धाव घेतली. आणि घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितलं त्यानंतर शिक्षकांनी येई पर्यंत तो संशयित पसार झाला होता. 

हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

सर्वत्र कौतुक 

फक्त मुलीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. मुलगी गेटमध्ये परत आल्यामुळे गेटवरील दोन महिलांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने अनोळखी इसम घेऊन जात होता, म्हणून परत आल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी मुलीच्या पालकांना बोलावले. मुलीच्या वडिलांनी सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. मात्र यानंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संभाजी नगर शहरात शाळकरी मुलांचे अपहरण करणारी टोळी तर सक्रिय झाली नाही ना याही चर्चा सुरुय.. या मुलीचे वडील व्यावसायिक आहे त्याही दृष्टीने पोलीस चौकशी करत आहे,मात्र या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीने दाखवलेली समय सुचकता, त्यामुळं मुलीचं कौतुक सुरु आहे.