औरंगाबाद : मराठवाडा आणि विदर्भात २०१७ मध्ये झालेल्या बोंडअळी आणि धानाच्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे ८ सदस्यांचे पथक औरंगाबादेत दाखल झालंय.
केंद्रातून आलेल्या या पथकानं औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव, शेकटा, या गावाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी काही ठिकाणी त्यांनी शेतात जाऊन पिकाची पाहणी करण्याचाही प्रयत्न केला.
मात्र, यावेळी शेतात काहीच नसल्यानं कसली पहाणी केली असा प्रश्न उपस्थित झालाय. या पहाणी दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी.