औरंगाबादमध्ये ट्रेलर- क्रूझरची धडक; ४ ठार

देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भविकांवर काळाचा घाला

Updated: Jan 31, 2020, 10:25 AM IST
औरंगाबादमध्ये ट्रेलर- क्रूझरची धडक; ४ ठार  title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. औरंगाबादमध्ये ट्रेलर आणि क्रूझरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाडजवळ पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. औरंगाबादहून सिंदखेडराजाकडे जाणारी क्रूझर, उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. या धडकेत क्रूझरमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.