उर्मिला मातोंडकर यांची हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नाव न घेता हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली.  

Updated: Jan 30, 2020, 11:29 PM IST
उर्मिला मातोंडकर यांची हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका title=
संग्रहित छाया

पुणे : जे इथे बाहेर घोषणा देत आहेत. रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्या नेत्यांना आज राजघाटावर जावे लागत आहे, हीच महात्मा गांधी यांची ताकद असल्याचे सांगत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नाव न घेता हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. पुण्यात CAA, NRC च्या निषेधार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात त्या बोलत होत्या. गांधींना कुणी मारलं? मुस्लिम, शीख, इसाई, नाही मारणारा हिंदूच होता. यातूनच काय ते समजते, असेही मातोंडकर म्हणाल्या.

NPR, NRC , CAA विरोधात सारसबाग चौकात सभा आयोजित करण्यात आली आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार जिग्नेश मेवानी, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील या सभेसाठी उपस्थित होते. संविधान बचाओ मंच आणि कुल जमात ए तंजीम यांच्यावतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी टीका केली.

 मोदी-शाह यांची कृती हिटलरप्रमाणे - जितेंद्र आव्हाड

CAA कायदा हा काळा कायदा आहे, म्हणून त्याला विरोध असल्याचे मातोंडकर म्हणाल्यात. जात-पात धर्म भाषा प्रदेश यावर आपले संविधान विरोध करत नाही. हा कायदा मुस्लिम विरोधी आहेच पण गरिबांच्या विरोधी पण आहे. १५ टक्के मुस्लिमांकडून ८५ टक्के बहुमताला धोका आहे, असे भासवले जात आहे. सगळ्या गोष्टी हिंदू-मुस्लिम या पातळीवर आणून ठेवले जात आहे, असे मातोंडकर म्हणाल्या.

गांधींनी अहिंसा मूल्य दिले, कोणताही दहशतवाद, फॅसिजम अहिंसेला हरवू शकत नाही. लोकशाही म्हणजे नेता नाही. संसद नाही तर लोक आहेत. आधी आपली लढाई इंग्रजांविरोधात होती. आता आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी विरोधात असल्याचे मातोंडकर म्हणाल्या.