किरकोळ वाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूहल्ला

एक धक्कादायक घटना. किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केला.  

Updated: Jan 12, 2019, 11:34 PM IST
किरकोळ वाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूहल्ला title=

औरंगाबाद : एक धक्कादायक घटना. किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केला. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. ज्योती नगर परिसरातील चाटे कोचिंग क्लासमध्ये ही दोन्ही मुले शिकतात. ट्युशन संपल्यावर पीडित मुलगा गणेश काळे हा पाणी पिण्यासाठी गेला असताना आरोपीने त्याच्या पाठीवर चाकूने वार केले. गणेशवर तीन वार करण्यात आले. यात तो जखमी झाला.

जखमी विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन्ही मुले अल्पवयीन आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.  या आधीही या दोन्ही मुलांची काहीतरी कारणावरून भांडण झाली असल्याचे शिक्षक आणि पालक सांगत आहेत. मात्र अचानक चाकू हल्ला झाल्याने सगळेच हादरलेत.