Crime News: आधी SEX केला आणि मग... नवी मुंबईत रिक्षा ड्रायव्हरने महिलेसोबत केले धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले

Navi Mumbai Crime News:  अवघ्या एक हजार रुपयासाठी रिक्षा चालकाने महिलेचा जीव घेतला आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. 

Updated: Apr 5, 2023, 10:24 PM IST
Crime News: आधी SEX केला आणि मग... नवी मुंबईत रिक्षा ड्रायव्हरने महिलेसोबत केले धक्कादायक कृत्य; पोलिसही हादरले  title=

Navi Mumbai Crime News:  नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने एका महिलेची हत्या केली आहे. हत्ये मागचे कारण समजल्यावर पोलिसही हादरले आहेत. अवघ्या एक हजार रुपयासाठी रिक्षा चालकाने महिसेचा जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे (Navi Mumbai Crime News). 

महापे-शिळफाटा येथील अडवली भुतवली गावालगतच्या जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. 22 मार्च रोजी घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद अहमद मोहम्मद अली साईन (36) या रिक्षा चालकाला अटक केली आहे.

आरोपी रिक्षा चालकाने मृत महिलेसोबत शरीर संबध ठेवले होते. यानंतर त्या महिलेने आरोपीकडे एक हजार रुपयांची मागणी होती. यातूनच त्यांच्यात वाद झाला.  याच वादातून रिक्षा चालकाने या महिलेच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालुन तिची हत्या केली. पोलिस तपासात मोहम्मद  यानेच या महिलेची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी  पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सलग तीन दिवसांच्या सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच संशयीत वाहनांच्या नोंदी घेऊन त्यांची छाननी केली. CCTV फुटेजमध्ये रिक्षामधुन एक महिला आणि रिक्षा चालक हे दोघेही अडवली भुतवली येथील गावदेवी मंदिराकडे जात असल्याचे आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजवरुन रिक्षाचा नंबर मिळवुन रिक्षा चालक मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन याला शिळफाटा येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. हत्या आणि  बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी मोहम्मद याला अटक केली आहे. मृत महिला कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.