Tender scam in Sambhajinagar: PM आवास योजनेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड

Tender scam in Sambhajinagar : संभाजीनगर महापालिकेच्या (Sambhajinagar Municipal Corporation) हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. (Maharashtra News in Marathi)

Updated: Feb 24, 2023, 12:36 PM IST
Tender scam in Sambhajinagar: PM आवास योजनेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड title=

Tender scam in Sambhajinagar : संभाजीनगर महापालिकेच्या (Sambhajinagar Municipal Corporation) हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. (Tender scam) एकाच लॅपटॉपवरुन टेंडर भरण्यात आल्याचं उघड झाले आगे. त्यामुळे महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या (Aurangabad News) तक्रारीवरुन तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक आणि भागीदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. (Maharashtra News in Marathi)

समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची 128 हेक्टर जमीन उपलब्ध करुन देण्यात आली होती. या घोटाळ्याची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. यामुळे मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

मनपा प्रशासक डॉ. चौधरी यांनी निविदेचा बारकाईने अभ्यास केल्यावर ही निविदा सिंगल आयपी एड्रेसवरुन भरली असल्याचे उघडकीस आले. एकाच लॅपटॉपवरून ही निविदा चारही कंपन्यांनी अपलोड केल्याचे समोर आले. हा संपूर्ण टेंडर घोटाळा उघडकीस येताच गुरुवारी रात्री मनपा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा ई-निविदेत फसवणूक करणाऱ्या  कंपनीसह तीन कंपन्यांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे मनपाने सांगितलं आहे. 

समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करुन देण्यात आली होती.