वाचवा वाचवानंतर पुण्यात आणखी एक ड्रामा, भाऊ थेट रस्त्यावरच झोपला... पाहा Video

वाचवा वाचवानंतर सोशल मीडियावर आणखी एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, पाहा नेमकं काय झालं

Updated: Oct 17, 2022, 07:50 PM IST
वाचवा वाचवानंतर पुण्यात आणखी एक ड्रामा, भाऊ थेट रस्त्यावरच झोपला... पाहा Video title=

पुणे : पुण्यात  (Pune) काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ (Video) प्रचंड व्हायरल झाला होता. एक पुणेकर पीएमपीएल (PMPL) बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूला उभा राहून मोठमोठ्याने 'वाचवा वाचवा' ओरडत होता. बसमध्ये थांबवून त्या प्रवाशाला उतरायचं होतं. पण बस ड्रायव्हरने बस पुढे नेली. त्यामुळे त्या तरुणाने  मला वाचवा, चालक माझं अपहरण करत आहे, अशी बोंबाबोंब केली. बसमधल्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

पुण्यात आणखी एक ड्रामा
आता पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. पुण्यात वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) अड़वल्यामुळे ट्रेन हुकल्याच्या निषेधार्थ एका एमपीएससीच्या विद्यार्थ्यानं अलका चौकात अनोखं आंदोलन केलं. थेट रस्त्यावर झोपून या विद्यार्थ्यानं आंदोलन केलं. ट्रेनचं तिकीट दाखवल्यानंतरही पोलिसांनी वेळेत न सोडल्याचा आरोप या विद्यार्थ्यानं केलाय. दिवाळीसाठी आपण गावी जाणार होतो. त्यासाठी रेल्वेचं तिकीट बूक केलं होतं. मात्र पोलिसांना विनंती करूनही त्यांनी वेळेत न सोडल्यानं गाडी हुकल्याचा दावा या विद्यार्थ्यानं केलाय. 

हा विद्यार्थी आपल्या बॅगांसह थेट रस्त्यावरच आडवा झाला. त्यानंतर त्या पठ्ठ्याने बॅगेतलं पुस्तक काढून वाचायलाही सुरुवात केली. विद्यार्थ्याचं हे आंदोलन पाहून रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. अखेर पोलीस बोलवावे लागले. पोलिसांनी त्या तरुणाची कशीबशी समजूत काढली आणि त्याला बसचं तिकिट काढून दिलं. 

पुण्यात कधी काय घडेल आणि पुणेकर कधी काय करतील हे सांगता येत नाही, या दोन घटनांवरुन ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.