अहमदनगर : येथील सभेत भाषण आटोपते घेण्यास सांगितल्याने खासदार दिलीप गांधी भडकले. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी भाजपच्या सभेत नाराजी नाट्य दिसून आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत काढली. मात्र, भाजपमधील पुन्हा एकदा नाराजी नाट्य दिसून येत आहे. जळगाव येथे व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्षांने बी. एस. पाटील या माजी आमदारांना आणि लोकसभा उमेदवाराला मारहाण केली होती. त्यामुळे येथे गोंधळ उडाला होता. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत खदखद दिसून येत आहे.
भाजप - शिवसेना युतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ अहमदनगरमध्ये झालेल्या सभेत व्यासपीठावर भाजपमधील नाराजीनाट्य उघड झाले. तिकीट कापलेले खासदार दिलीप गांधी हे भाषण करत असतानाच त्यांना थांबवण्यात आले. त्यामुळे गांधी व्यासपीठावरच संतापले. आपण १० मिनिटं बोलणार, असे सांगतानाच नाराज होऊन आता बोलूही देणार नाही का असा सवाल त्यांनी विचारला.
संतापलेले खासदार गांधी नाराज होऊन जाऊ लागले असता त्यांना थांबवण्यात आले. खासदार गांधी यांची ही नाराजी मुख्यमंत्र्यांच्याही कानी गेली. आपण काळजी करू नका, आम्ही तुमची काळजी घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी गांधी यांना सांगितले.