Devendra Fadnavis On Raj Thackeray : शिवसेना (Shiv sena) आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. राजकारणात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. मात्र, मागील काही वर्षात भाजपने ही परंपरा मोडीत काढली आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहित निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्य़ावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंच्या पत्राचा (Raj Thackeray Letter) जरी विचार करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची देखील चर्चा करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आम्ही उमेदवार दिल्याने चर्चा करणं गरजेचं आहे. याआधी देखील आम्ही तशाप्रकारची भूमिका देखील घेतली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये तसंच आर आर पाटलांच्या वेळी देखील आम्ही तशाप्रकारचा विचार आम्ही केला होता, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv sena) आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी देखील मला चर्चा करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता ऋतुजा लटकेंविरोधात भाजप माघार घेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
आणखी वाचा - "अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नका"; राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र
दरम्यान, राज ठाकरेंना भाजपने (BJP) पत्र द्यायला लावलं का?, असा सवाल शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी विचारला आहे. तर दुसरीकडेल राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रामुळे भाजपला संस्कृती समजली, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं सामान्यवर्गातून देखील स्वागत होताना दिसतंय. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेणार? आपला उमेदवार मागे घेणार की नाही?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.