कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : सर्वांच्यात आयुष्यात चढ उतार येत असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना देखील आयुष्यात कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. अमृता यांनी स्वत: त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठोर प्रसंगाचा अनुभव कथन केला आहे.
अमृता फडणवीस यांनी महसूलमंत्री विखे यांच्या गावचा दौरा केला. महिला बचत गट कर्ज वाटप, महिलांसाठी जिम आणि विविध लोकार्पण कार्यक्रमांना त्यांची प्रमुख उपस्थिती होती. जिमच्या उद्घाटन प्रसंगी व्यायाम सुविधांच प्रात्यक्षिक अमृता फडणवीस यांनी केले. राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले.
अमृता फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तुमच्या आयुष्यातील सर्वात कठिण प्रसंग कोणता? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी अमृता यांना विचारला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अमृता फडणवीस यांनी त्यांच्या जीवनातील सर्वात अवघड प्रसंग सांगितला. मुलगी तीन महिन्यांची असताना कामावर रुजू व्हावं लागल. हा माझ्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग असल्याचे अमृता फडणविस यांनी सांगितले.