भरदिवसा 6 जणांचा युवकावर प्राणघातक हल्ला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

शहरातील अतिशय धक्कादायक प्रकार 

Updated: Mar 30, 2021, 10:28 AM IST
भरदिवसा 6 जणांचा युवकावर प्राणघातक हल्ला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती शहरातील नवसारी परिसरात असलेल्या यश बारसमोर सहा जनांनी जुन्या वादातून भूषण पोहकर या २१ वार्षिय युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड, लाठ्या, चाकु आणि लाता भुक्यानी मारहान करत प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

या प्राणघातक हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असुन हा प्रकार पाहल्यानंतर अमरावतीत कायद्याचे राज्य आहे गुंडाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान या घटने नंतर गाडगे नगर पोलिसांनी सहा पैकी पाच आरोपींना अटक केली आहे. 

अमरावती शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांत हत्येच्या घटना मध्ये वाढ झाली आहे. अशातच २७ तारखेच्या दरम्यान अमरावती शहरातील नवसारी परिसरातील यश बार समोर ही घटना घडली. हल्ला प्राणघातक हल्ला झालेला भूषन पोहकर हा यश बार जवळ आला असताना. नवसारी मधील सहा आरोपी तेथे आले व त्याला लोखंडी रॉड, चाकु, लाठ्यानी जबर मारहाण केली. 

आरोपीनी मारहाण एवढी केली की भूषण हा काही वेळ मरणासन्न अवस्थेत खाली पडला होता. दरम्यान या हल्ल्यात भूषण हा गंभीत जखमी झाला असून त्याच्या वर रुग्णालयात उपचार सुरू आहे.