Maharashtra MLC Election Result 2023: अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची

Maharashtra MLC Election Result 2023: अमरावती पदवीधर मतदारसंघाची (Amaravati MLC Election) मतमोजणी अजून सुरुच आहे.  (Amravati Graduate Constituency) दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Maharashtra Political News in Marathi)  

Updated: Feb 3, 2023, 08:20 AM IST
Maharashtra MLC Election Result 2023: अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची title=

Maharashtra MLC Election Result 2023 : अमरावती पदवीधर मतदारसंघाची (Amaravati Graduate Constituency Election) मतमोजणी अजून सुरुच आहे. दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस (BJP and Congress) कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल मध्यरात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यासमोर जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजप उमेदवार रणजीत पाटील मतमोजणी केंद्राबाहेर निघून गेले.  (Maharashtra News in Marathi)

अमरावती पदवीधर मतदारसंघात 23 तासांपासून मतमोजणी सुरुच, भाजपला धक्का

अमरावती पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरुच आहे. विजयी उमेदवारासाठी मताचा कोटा जाहीर झाला आहे. निवडून येण्यासाठी 46927 मतांचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना 43340 मते मिळाली आहेत. तर भाजपचे रणजीत पाटील यांना मिळाले 41027 मते मिळाली आहेत. लिंगाडे यांना कोटा पूर्ण करण्यासाठी 3580 मतांची गरज आहे. तर अमरावती पदवीधर निवडणुकीत वैध मते 93852 मते असून दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

दरम्यान,  अवैद्य मतांवर भाजपने घेतला आक्षेप घेतला आहे. मतांची पुन्हा पडताडणी करण्याची भाजपची मागणी आहे. अवैध मतांच्या पडताडणीला पुन्हा सुरुवात झाली असून भाजपने आक्षेप घेतल्याने मतमोजणी प्रक्रिया पुन्हा लांबली आहे. आता मतांच्या कोट्यात बदल होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभाग पदवीधर निवडणूक मतमोजणी गेल्या 23 तासापासून मतमोजणी सुरुच आहे. माविआचे धीरज लिगांडे यांची विजयाकडे घोडदौड केली आहे. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी  47 हजार 101 मतांची गरज आहे. मतमोजणीतून आतापर्यंत 10 उमेदवार बाद अजूनही 11 उमेदवारांची मते मोजली जात आहे. दिवस रात्र सलग मतमोजणी सुरुच असून सकाळी 10 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता आहे.