चोरट्यांकडून गोळीबार, तरुण गंभीर जखमी

लुटण्याच्या उद्देशाने एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा अंबरनाथमध्ये घडलीय.

Updated: Jul 26, 2017, 12:20 PM IST
चोरट्यांकडून गोळीबार, तरुण गंभीर जखमी  title=

अंबरनाथ : लुटण्याच्या उद्देशाने एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा अंबरनाथमध्ये घडलीय.

या धक्कादायक घटनेत १९ वर्षीय आकाश घोडके हा तरुण गंभीर जखमी झालाय. अंबरनाथच्या लोकनगरी भागात ही घटना घडली. 

आकाश त्याच्या मैत्रिणीसोबत रात्री ८ वाजल्याच्या सुमारास लोकनगरी मैदानात गप्पा मारत उभा होता. यावेळी अचानक काही जणांनी येऊन हवेत गोळीबार केला आणि त्यांच्याकडे पाकिटाची मागणी केली. 

पाकीट घेतल्यानंतर चोरट्यांनी आकाशच्या हातावर गोळीबार केला आणि ते पसार झाले... या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.