अलिबाग : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या विधीमंडळात मान्य करून घेण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभर संवाद यात्रा सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून कोकण विभागाची संवाद यात्रा, किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथून सुरु झाली. तर खोपोलीत सभा घेण्यात आली. शेतकरयांना हमीभाव मिळावा यासह इतर मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभर संवाद यात्रा सुरू आहेत. कोकण विभागाची संवाद यात्रा आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथून सुरू झाली. राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून ही यात्रा महाडकडे रवाना झाली. महाड शहरात शिवाजी चौकातील शिवपुतळयाला अभिवादन करण्यात आले. तेथून ही यात्रा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली.
या दरम्यान खोपोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा आरक्षण मिळावे याबरोबरच आंदोलना दरम्यान झालेल्या केसेस मागे घ्याव्यात, शेतकरयांना हमीभाव मिळावा यासह इतर मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या संवाद यात्रेत रायगड रत्नागिरी आणि ठाणे जिल्हयातील मराठा बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.