अहमदनगर: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे ७५ मुलांना गॅस्ट्रोची लागण

९ मुलांना लोणी येथील  प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी  हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.

Updated: Jul 31, 2018, 12:22 PM IST

अहमदनगर : अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील 75 मुलांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. लागण झालेल्या मुलांमध्ये शासकीय आश्रम शाळेतील २५ आणि वारकरी संस्थेच्या ४५मुलांचा समावेश आहे. यातील ९ मुलांना लोणी येथील  प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी  हलवले आहे. उर्वरित मुलांवर संगमनेर तालुक्यातील घारगाव प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहे.