अकोला : आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, ऐकल्या असतील. म्हणजे कधी कोणाचं पाकिटं चोरीला जातं, कधी कोणाचा मोबाईल..कधी सोनं..तर कधी पैसे वैगेरे... पण आता तुम्ही ज्या चोरीबद्दल ऐकणार आहात कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. अकोल्यातील ही चोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. चोरट्यानं चक्क अकोला आगारातून बस चोरलीय. पैसे, सोनं चोरी करणारा मनुष्य ते त्याबदल्यात काहीतरी मिळवत असतो. पण बस चोरी करुन हा पुढे काय करणार होता हे काही पोलिसांना अद्याप कळालं नाहीयं.
अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकातून रात्री मुक्कामी असलेली एमएच १४ बीटी ०६४२ क्रमांकाची बस गायब दिसली. ही बस प्रवासात असावी असं आधी वाटलं पण नंतर एक विचित्र सत्य समोर आलं.
सीसीटीव्ही फुटेज पाहता ही बस कोणीतरी पळवून नेत असल्यास काहींच्या लक्षात आलं. यानंतर वेगाने सुत्र हालायला सुरूवात झाली आणि पोलिसांनी याचा मागोवा घ्यायला सुरूवात केली.
चोरट्याने बस पळवून नेलीय हे एव्हान सर्वांच्या लक्षात आलं. अकोल्यापासून अंदाजे ६० ते ७० किलोमीटर अंतरावरील मंगरूळपीर- वाशीम मार्गावर, रस्त्याच्या कडेला पलटलेल्या अवस्थेत ही बस सापडली.
दरम्यान, चोरी झालेली बस वाशीम जिल्ह्यात सापडलीय. मंगरूळपीर-वाशीम मार्गावर अपघातग्रस्त स्थितीत ही बस आढळली आहे.
बस सापडली तरी बस चोर काही अजून पोलिसांना सापडला नाही.