पेट्रोलिंगच्या नावाखाली पोलिसाचे विवाहित महिलेशी अश्लील वर्तन

 पेट्रोलिंगच्या नावाने घराची झडती घ्यायचं सांगत रात्रीबेरात्री विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील वर्तन

Updated: Nov 3, 2018, 07:30 PM IST
पेट्रोलिंगच्या नावाखाली पोलिसाचे विवाहित महिलेशी अश्लील वर्तन title=

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला प्रमोद बागडे या पोलीस शोध पथकातील कर्मचाऱ्याकडून विवाहित महिलेशी अश्लील वर्तन केल्याचं प्रकरण समोर आलंय. पेट्रोलिंगच्या नावाने घराची झडती घ्यायचं सांगत बागडे हा रात्रीबेरात्री विवाहितेच्या घरात घुसून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केलाय.

विनयभंगाचा गुन्हा 

पीडित तक्रारीवरुन पोलीस कर्मचारी प्रमोद बागडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान, या धक्क्यातून महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

वेळीच रोखल्याने पीडित महिलेचे प्राण वाचले. या महिलेवर अमळनेरमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पीडितेवर दबाव 

फिर्याद दाखल होऊ नये यासाठी पीडित कुटुंबियांवर प्रचंड दबाव देखील आलाय.

या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली होती.