अजित पवारांची 'घरवापसी', पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये येणार

गेल्या काही दिवस पिंपरी चिंचवड मधल्या जनतेला गेले अजित पवार कुणीकडे असा प्रश्न पडला होता.

Updated: Jun 28, 2017, 06:11 PM IST
अजित पवारांची 'घरवापसी', पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये येणार title=

पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवस पिंपरी चिंचवड मधल्या जनतेला गेले अजित पवार कुणीकडे असा प्रश्न पडला होता. अखेर अजित पवारांनी पिंपरी चिंचवड शहरात यायचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील पराभवाने नाराज झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पराभवाचं शल्य विसरून पुन्हा एकदा शहरात लक्ष घालायचं ठरवलंय. येत्या ६ जुलैला त्यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्ज करणे हा या मेळाव्याचा उद्देश असला तरी मरगळलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यात अजित पवार कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.