Ajit Pawar on BJP Agitation : 'स्मारकाच्या सगळ्या जीआरमध्ये स्वराज्यरक्षक उल्लेख आहे. ( Maharashtra Political News) मी कधीही महापुरुषांबद्दल चुकीचे बोललेलो नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून महापुरुषांचा अपमान करण्यात आला आहे. राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य झाले आहे. मात्र, त्यांना माफी मागण्याचे सांगण्याऐवजी मास्टरमाईंडच्या आदेशानंतर माझ्याविरोधात आंदोलनाचे आदेश भाजपकडून ( BJP ) निघाले, असे थेट आरोपाला प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे.
माझ्या भाषणावर दोन दिवसांत बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी महाराजांच्या स्मारकाचा निर्णय मीच घेतला आहे. स्मारकासाठी निधीही त्यावेळी मीच मंजूर केला आहे. स्मारकासाठी प्रशासनाला कामाला लावले आहे. 'वढू तुळापूर विकास आराखड्यालाही मान्यता दिली', 'संभाजी महाराज स्मारकासाठी 2022 मध्ये मंजुरी दिली आहे. त्यांच्याबद्दल मी काही चुकीचे असं बोललेलो नाही, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले.
दरम्यान, संभाजी महाराजांबाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत भाजपनं राज्यभर निदर्शनं केली. अजित पवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. खुद्द शरद पवार यांनीही यावरुन अजित पवार यांचे कान टोचले. अखेर अजित पवार आज यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. दरम्यान, महापुरुषांच्या अपमानावर विरोधकांचा दुटप्पीपणा उघड झाल्याची टीका संजय राऊतांनी केलीय.
अजित पवार म्हणाले, विधिमंडळात केलेल्या भाषणावरुन बऱ्याच घटना महाराष्ट्रात घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करण्याविषयी बोलत होतो. मार्चमध्ये जाहीर केले होते. पुणे याबाबत बैठका झाल्या आणि जीआर निघाला. सगळीकडे स्वराज्य रक्षक असाच उल्लेख आहे. कुठल्याही महापुरुषाबद्दल स्त्रियांबद्दल मी चुकीच बोलत नाही. भाजप गेल्या दोन दिवसापासून आंदोलन करत आहे. माझा राजीनामा मागत आहेत. मला माझ्या पक्षाने विरोधी पक्ष नेता बनवला आहे भाजपने नाही. भाजपचे काय पदाधिकारी मला फोन करुन सांगत आहेत की दादा तुम्ही काय चुकीचं बोलला आहात, आम्हाला काही कळत नाही. पण आम्हाला पक्षाने आंदोलन करण्यास सांगितले आहे, अशी माहिती यावेळी अजितदादानी दिली.
राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, गोपिचंद पडळकर यांनी चुकीची वक्तव्य महापुरुषाबद्दल केलेली आहेत. असे असताना त्यांच्याबाबद काही तोंडून शब्द काढले जात नाही. मी काही चुकीचे बोललेलो नाही, त्याबद्दल आंदोलन करणे योग्य नाही. राज्यपालांनी महापुरुषांच्या अपमाना केलाय. त्यांना माफी मागण्या बद्दल कोणी बोलत नाही, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.