अजिंठा-वेरूळ लेणी व्हिजीटर सेंटरचा वीजपुरवठा खंडीत

पर्यटनाच्या दृष्टीनं जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या व्हिजीटर सेंटरचा वीज पुरवठा महावितरणनं खंडीत केला आहे. 

Updated: Nov 10, 2017, 03:35 PM IST
अजिंठा-वेरूळ लेणी व्हिजीटर सेंटरचा वीजपुरवठा खंडीत title=

औरंगाबाद : पर्यटनाच्या दृष्टीनं जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या व्हिजीटर सेंटरचा वीज पुरवठा महावितरणनं खंडीत केला आहे. दोन्ही सेंटरकडे प्रत्येकी 35 लाख रुपयांची थकबाकी आहे.  

दोन्ही सेंटरकडे 35 लाखांची थकबाकी

ही थकबाकी भरण्यासाठी महावितरणनं महिनाभराआधी नोटीसही पाठवली होती, मात्र एमटीडीसी प्रशासनाकडून कुठंलही उत्तर न आल्यानं अखेर विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून हे व्हिजीटर सेंटर बांधण्यात आले आहे. 

कोट्यवधी खर्चून व्हिजीटर सेंटरची उभारणी

या ठिकाणी लेणींच्या प्रतिकृतीसुद्धा तयार करण्यात आल्या आहेत, तर लेणींची माहिती इतिहास सांगण्यासाठी छोट्या चित्रपटही दाखवण्यात येतो.
 

देशीविदेशी पर्यटकांचा हिरमोड होणार

वीज पुरवठा खंडीत झाल्यानं हे सेंटर बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक देशीविदेशी पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं इतक्या महत्वाच्या ठिकाणाबाबत एमटीडीसीची ही भूमिका निश्चितच लाजिरवाणी आहे.