अहमदनगर : रेखा जरे हत्याप्रकरणी (Rekha Jare Murder Case) मोठा खळबळजनक माहिती समोर आली आहे. या हत्या प्रकरणात नगरमधील ज्येष्ठ पत्रकाराचा सहभाग समोर आला आहे. मात्र हा आरोपी पत्रकार फरार आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींनी अटक करण्यात आलीय. या सर्वांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अहमदनगर येथील यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदनगर येथील एका जेष्ठ पत्रकारचे नाव या खुनामध्ये सहभागी असल्याचा खुलासा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केला आहे.
आतापर्यंत या प्रकरणामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना सात डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात अली आहे. तर पोलीस अधीक्षकांनी खुलासा केलेले ज्येष्ट पत्रकाराला अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.