लोकवस्तीत १० फुटी अजगर

सृष्टीमित्र परिवार आणि वनविभागाकडून या अजगराला जंगलात सोडण्यात आले.

Updated: Sep 11, 2017, 11:27 AM IST
लोकवस्तीत १० फुटी अजगर title=

अहमदनगर : अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे लोक वस्तीत १० फुटी अजगर आढळून आला.. आबू भोंडवे यांना घराच्या परिसरातील झाडाजवळ हा अजगर दिसला. १० फुटाचा अजगर असल्यामुळे भोंडवे यांना सर्पमित्रांना यासंदर्भात माहिती दिली.

 एक तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात आले. ही बातमी कळताच अजगर पाहण्यासाठी परिसरातून नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सृष्टीमित्र परिवार आणि वनविभागाकडून या अजगराला जंगलात सोडण्यात आले.