कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकारांना धक्काबुक्की

कृषीमंत्री सदाभांऊ खोत यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना मिरज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी धक्काबुक्की केली. 

Updated: Jun 5, 2017, 02:05 PM IST
कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकारांना धक्काबुक्की  title=

सांगली : कृषीमंत्री सदाभांऊ खोत यांची मुलाखत घेण्यासाठी आलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना मिरज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी धक्काबुक्की केली. 

कोणाची परवानगी घेऊन आलात, तुम्ही मुलाखत घ्यायची नाही, असं सांगत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. पत्रकारांना धक्काबुक्की करणा-या पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचा सांगली जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने निषेध करण्यात आलाय.

पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांचं वर्तन बघता, या पुढे काय ? पोलिसांची परवानगी घेऊन मंत्र्यांची मुलाखत घ्यायची काय ? असा संतप्त सवाल पत्रकारांकडून उपस्थित होतोय.