चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला

विवस्त्र आवस्थेतील गर्भवतीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गर्भवतीचा चेहरा आणि हातही जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 4, 2018, 08:45 AM IST
चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला title=

यवतमाळ : विवस्त्र आवस्थेतील गर्भवतीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गर्भवतीचा चेहरा आणि हातही जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात खडकी गावाजवळील पिंपरी किन्ही मार्गावर हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. काही मजुरांना धरणाच्या लघु कालव्यात मानवी देहसदृष्ट काहीतरी संशयास्पद वस्तू दिसली. त्यामुळे मजुरांची उत्सुकता वाढल्याने त्यांनी पुढे जाऊन अधिक निरकून पाहिले असता ही वस्तू नसून एका गर्भवतीचा मृतदेह असल्याचे दिसले. 

हा प्रकार पुढे येताच गावात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळावर हजेरी लावली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, मारेकऱ्यांनी गर्भवतीचा चेहरा छिन्नविच्छींन्न करून जाळल्याने तसेच हातही जाळल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, हा मृतदेह गावातील व्यक्तीचा नसून, बाहेरीलच कोणत्यातरी व्यक्तीचा असावा. तिचा खून करून मृतदेह धरणाच्या कालव्यात आणून टाकला असावा असा संशय पोलिसांना आहे.