ठाकरे गट आणि काँग्रेस पाठोपाठ आता शिंदे गटाच्या आमदाराचा धारावी पुनर्वसनाला विरोध

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आता सरकारमधूनच विरोध होत आहे. सत्ताधारी  शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी  धारावी पुनर्वसनाला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jun 13, 2024, 06:34 PM IST
ठाकरे गट आणि काँग्रेस पाठोपाठ आता शिंदे गटाच्या आमदाराचा धारावी पुनर्वसनाला विरोध title=

Dharavi Redevelopment  : धारावी पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची  शक्यता आहे. सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिवसेना शिंदे गटाच्या अमदरानेच आता धारावी पुनर्वसनाला विरोध केला आहे. सत्ताधारी आमदार मंगेश कुडाळकर यांनी  धारावी पुनर्वसनाला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. तसेच या विरोधात   मंगेश कुडाळकर स्वत: आंदोलन करणार आहेत. 

धारावीतील हजारो प्रकल्पबाधितांना कुर्ल्याच्या 8 एकर जागेवर पुनर्वसन करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. या निर्णयाविरोधात आता सत्ताधारी आमदार मंगेश कुडाळकर आंदोलनात उतरणार आहे. कुर्ला पूर्व येथील मतृदुग्धशाळा येथील जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्प मधील झोपडीधारकांना घरे उपलब्ध करण्यासाठी शासन निर्णय झाला आहे, याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र येऊया अशी पोस्ट  मंगेश कुडाळकर यांनी   सोशल मिडियावर केली होती. आधीपासून 
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या प्रकल्पाला तीव्र विरोध करत आहे

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राहुल शेवाळेंनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. धारावीतील पात्र लोकांचं धारावीतच पुनर्वसन होणार आहे. प्रकल्प रखडवण्यासाठी अफवा पसरवल्या जात असल्याचं राहुल शेवाळेंनी म्हटलंय...अपात्र लोकांचं पुनर्वसन करण्याचेही प्रयत्न सुरू असून, प्रकल्प रखडवण्यासाठी ठाकरेंचा डाव असल्याचा आरोप शेवाळेंनी केला आहे. 

धारावी ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी  आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल साडेपाचशे एकर परिसरावर ही झोपडपट्टी वसलीय. या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी सरकारने धारावी पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करून सुरुवातीला पाच सेक्टरमध्ये पुनर्विकास करण्याचे सरकारने ठरवलं होतं. त्यापैकी पाचवा सेक्टर म्हाडाला देण्यात आला.