कोकणात राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की

मुंबईत भाजप-काँग्रेस संघर्ष सुरु असताना कोकणात भाजप-शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले आहेत

Updated: Feb 14, 2022, 02:40 PM IST
कोकणात राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की title=

सिंधुदुर्ग :  मुंबईमध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) संघर्ष सुरु असतानाच आता कोकणाता भाजप आणि शिवसेना (ShivSena) आमने सामने आले आहेत. कुडाळमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची बातमी समोर येतेय.

कुडाळ नगरपंचायतीजवळ नगराध्यक्ष निवडणुीकवरुन भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  भाजप कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीपासून काही अंतरावर पोलिसांनी रोखलं. त्याचवेळी शिवसेने आमदार वैभक नाईक (Vaibhav Naik) आणि शिवसेनेचे काही नगरसेवक गाडीने त्या ठिकाणी आले,

याला भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यावरुन सुरु शाब्दिक बाचाबाची सुरु झाली आणि नंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. 

पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत तणाव मिटवला आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे. 

रस्त्याच्या एका बाजूला शिवसेना कार्यकर्ते आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु असल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.