Maharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, 'मंत्रीपदाची स्वप्नं...'

Maharastra political Cricis: अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

Updated: Jul 2, 2023, 07:01 PM IST
Maharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, 'मंत्रीपदाची स्वप्नं...' title=
Aaditya Thackeray On Ajit Pawar Oath

Aaditya Thackeray On Ajit Pawar Oath:  अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता अजित पवारांनी राजकीय वर्तुळात भूकंप घडवलाय. अशातच आता अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न मी विचारत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना 1 वर्ष उलटल्यावरही काय मिळालं? असा पहिला प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.

रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.  एक गद्दार टीव्हीवर म्हणाले, 145 जागा जिंकायच्या असतील तर यांना सोबत घ्या, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला? असा सवाल ठाकरेंनी विचारला आहे.

आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.  मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना... एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे. 'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

पाहा ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबत देखील जाऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.