दीपक भातुसे, मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून अजून नावे ठरलेली नाहीत. पण उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा असल्याचं पुढे आलं आहे. गुरुवारी १२ जागांचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार आहे. पण काँग्रेसची नावं अद्याप निश्चित झालेली नसल्याचं देखील कळतं आहे. दिल्लीतील वरिष्ठांनी अजून ही नाव अंतिम केली नसल्याची माहिती पुढे आली होती.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मार्च 2019 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसने त्यांनी उमेदवारी ही दिली होती. पण भाजप आमदार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रस्ताव नेमकी कोणत्या स्वरूपात येणार याबाबत अनिश्चितता आहे. उद्या होणारी मंत्रिमंडळ बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे. 12 नावांसह प्रस्ताव आणायचा की 12 जागांवर आमदार नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्याबाबत प्रस्ताव आणायचा यावर अद्याप निर्णय झालेला नाही. 12 जागांवर नियुक्तीचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देऊन काही काळाने ही नावं राज्यपालांकडे देण्याचा पर्याय आहे. त्यामुळे थेट 12 नावांसह प्रस्ताव येणार की मुख्यमंत्र्यांना नियुक्तीचे अधिकार देऊन नंतर मुख्यमंत्री राज्यपालांना नावं पाठवणार हे अजून अस्पष्ट आहे.
उदयाची मंत्रिमंडळ बैठक रद्द होऊन गुरुवारी दुपारी 1 वाजता मंत्रालय येथे होणार आहे. विधानपरिषदेची नावं अंतिम होत नसल्याने बैठक पुढे ढकलल्याची चर्चा आहे.