काँग्रेसेचे माजी मंत्री चतुर्वेदी यांच्यांवर कारवाई होणार!

 काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांसाठी शहर काँग्रेसनं बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली एक आठवड्याची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 3, 2018, 09:05 AM IST
काँग्रेसेचे माजी मंत्री चतुर्वेदी यांच्यांवर कारवाई होणार! title=

नागपूर : काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांसाठी शहर काँग्रेसनं बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली एक आठवड्याची मुदत संपली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

निलंबनाची कारवाई अटळ

आठवडा झाला तरीही  नोटीसीला उत्तर नसल्यामुळे चतुर्वेदींवर काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई अटळ असल्याचं सांगण्यात येत आहे.महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली होती. पक्षाच्या अधिकृत  उमेदवाराविरुद्ध अनेक बंडखोर उमेदवार उभे करण्यात आले होते. या बंडखोरांना चतुर्वेदींनी पाठबळ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

पक्षविरोधी काम भोवणार

पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवल्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांना नोटीस बजावली होती. नागपूर शहर काँग्रेसमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार विरुद्ध माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत, अनिस अहमद यांच्यात वाद आहे. त्यामुळे चतुर्वेदी यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.