सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक झाल्याची घटना पुण्यात उघडकीस आली होती. या प्रकरणी पुण्यातील पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी आज ऑनलाईन फसवणूक दोघांना ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ, आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरला तक्रार दिली होती. मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला.
नेमकी घटना काय होती?
आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करून मुकेश राठोड या नावाने एका व्यक्तीने फोन केला. आई बाणेर इथल्या हॉस्पिटलम्ये दाखल असून तिच्या औषध आणि उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचं सांगत पैशांची मागणी करण्यात आली होती. उपचारासाठी 3 हजार 400 रुपये गुगल पे नंबर पाठवून त्यावर पाठवण्यास सांगण्यातआलं.
आमदार माधुरी मिसाळ यांच्याशिवाय, आमदार देवयानी फरांदे, आमदार मेघना साकोरे, आमदार मेघना बोर्डीकर आणि आमदार श्वेता महाले यांनाही आरोपी मुकेश राठोड याने फोन करून अशाच प्रकारचे कारण सांगून पैशाची मागणी केली होती.
कोण आहेत आरोपी?
याप्रकणी पोलिसांनी मुकेश राठोड आणि सुनीता क्षीरसागर या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे दोघंही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. मुकेश राठोड हा बी.ए झालं आहे. तर सुनीता ही बीएएसी आहेत. मुकेश आणि सुनीता हे दोघंही शेतकीर कुटुंबातील असून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
या दोघांनी मिळून चार आमदारांकडून पैसे घेतले. यासाठी त्यांनी ज्या गुगल पे नंबरचा वापर केला होता तो सुनीता क्षीरसागरचा होता. दोघांनाही खर्चासाठी पैसे हवे होते. वैद्यकीय कारण सांगतिलं की पैसे मिळतात याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी आई आजारी असल्याचं कारण सांगितलं.
सध्या या दोघांनाही औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.