बदलापूर : मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा आणि इगतपुरी दरम्यान अपघात झाला. गाडीचे मागून दुसऱ्या डब्याचे चाक घसरले. पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तीन पैकी दोन मार्गावरुन सध्या वाहतूक सुरु आहे. मुंबईहून येणारी मुंबई - गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसचा एक डबा कसारा घाटात घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र कसाऱ्या पुढील वाहतूक ठप्प झाली आहे.
मुबंईहून गोरखपुरला ही अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेस जात होती. यावेळी पुलावर एका डब्याचे चाक घसरले. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पुलावर या गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठा अपघात टळला. अन्यथा १०० फुट खोल ही गाडी खाली पडली असते. दरम्यानस किरकोळ अपघात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्या आली आहे.
या अपघातामुळे पहाटे चार वाजल्यापासून प्रवासी येथे अडकले होते. रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला होता. रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाऱ्या सर्व गाड्या अप मार्गाने वळविल्या आहेत. गाडी पुलावरून बाजुला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू होते.