मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात,कोणतीही जीवित हानी नाही

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आहे. खंडाळा बोर घाटामध्ये 2 ठिकाणी अपघात झाला असून, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Updated: Dec 23, 2017, 12:57 PM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात,कोणतीही जीवित हानी नाही title=

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात झाला आहे. खंडाळा बोर घाटामध्ये 2 ठिकाणी अपघात झाला असून, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र एकूनच शनिवार आणि रविवारला जोडून आलेल्या ख्रिसमस च्या सुट्टीमुळे पर्यटन नगरी लोणावळ्यात पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. या सुट्ट्यांच्या धर्तीवर एक्सप्रेस हायवे ने मुंबई कडून लोणावळ्याकडे तसेच पुढे पाचगणी महाबळेश्वर कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने खंडाळा बोर घाटात वाहतूक कमालीची मंदावली असून वाहनाच्या मुंबईच्या दिशेने पाच ते सहा किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.