मुली शिक्षक भरतीत अपात्र! अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया...

शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले असून, यामध्ये राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आली आहेत. 

Updated: Aug 8, 2022, 10:37 AM IST
मुली शिक्षक भरतीत अपात्र! अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया... title=

सिल्लोड : शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले असून, यामध्ये राज्याच्या मंत्र्यांच्या मुलींची नावं समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच 7880 उमेदवारांची यादी समोर आली. परिक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली आहेत. 

या प्रकरणी अब्दुल सत्तार स्पष्टीकरण दिलं. 'मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं' अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. 'आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी' असंही सत्तारांनी म्हटलं आहे 
 

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वीच 7880 उमेदवारांची यादी समोर आली. परिक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादिमध्ये हिना अब्दुल सत्तार आणि उझमा अब्दुल सत्तार या माजी राज्यमंत्र्यांच्या मुलींचीही नावं समोर आली आहेत. 

उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत. दरम्यान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रं रद्द करण्यात आली आहेत. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. 

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.