घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि... मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना

मुंबईच्या चेंबुर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून एका महिलेवर आणि तिच्या मुलीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे.  

Updated: Sep 22, 2023, 12:02 AM IST
घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि... मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना title=

Mumbai Chembur Crime News : आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची खळबजनक घटना कल्याणमध्ये घडली होती. आता अशीच एक थरारक घटना मुंबईच्या चेंबुर परिसरात घडली आहे. चेंबूरमध्ये एका माथेफिरुने महिलेच्या घरात घुसून महिला आणि तिच्या मुलीवर वार करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

चेंबूरच्या सेल कॉलनी परिसरात ही घटनी घडली आहे.  राहुल निषाद (वय 34 वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. राहुल याने सेल कॉलनी परिसरातच राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर आणि तिच्या चार ते पाच वर्षांच्या मुलीवर चाकूहल्ला केला. बुधवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. यादोघींवर चाकुने हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतःवर देखील वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला आहे.  याबाबत नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

कल्याणमध्ये तरुणाचा अल्ववयीन मुलीवर प्राणघातक हल्ला 

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात एका तरुणाने अल्ववयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात या मुलीचा मृत्यू झाला. तरुणानं चाकूने मुलीवर 7 ते 8 वार केल्याने मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. दुर्गा दर्शन सोसायटीत राहणारी आई आपल्या मुलीला घरी घेऊन जात असताना सोसायटीच्या आवारातच ही घटना घडली. नागरिकांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होते.