Mumbai Crime: घोर कलयुग! 12 वर्षाच्या पोराने आंटीची छेड काढली; जबरदस्ती मिठीत घेऊन असं काही केलं की...

Mumbai Crime: उल्हासनगर परिसरात  भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चक्क एका वयोवृद्ध महिलेची छेडछाड करत भररस्त्यावरच  महिलेसह अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

Updated: Dec 6, 2022, 11:26 AM IST
Mumbai Crime: घोर कलयुग! 12 वर्षाच्या पोराने आंटीची छेड काढली; जबरदस्ती मिठीत घेऊन असं काही केलं की...

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, ठाणे Mumbai Crime:  राज्यात महिलेंच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर आला असतानाच, उल्हासनगरमध्ये(Ulhasnagar) एक धक्कादायक घटना घडली आहे.  12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने वयोवृद्ध महिलेचा विनयभंग केला आहे. या मुलाचा सर्व प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र, पीडित महिलेने या मुलाविरोधात पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही(Crime News).   

उल्हासनगर परिसरात  भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  12 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने चक्क एका वयोवृद्ध महिलेची छेडछाड करत भररस्त्यावरच  महिलेसह अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मात्र, या प्रकरणी पीडित वयोवृद्ध महिला ही या घटनेमुळे भयभीत झाल्याने तिने अद्याप या प्रकरणी पोलिसात तक्रार केलेली नाही. मात्र या विकृतीचा हा धक्कादायक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

सध्या या घटनेचा व्हडीओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, दुसरीकडे एका अल्पवयीन मुलाने  अशा प्रकारचे कृत्य करणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा नेटकऱ्यांकडून केली  जात आहे. मात्र,  या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा  ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पोलीस प्रशासन काय कारवाई करतील? या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी यावर स्वतःहून पुढे येऊन करवाई करण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.