हातात चामड्याचा पट्टा आणि.... डहाणूत फिरणाऱ्या माथेफिरुला पाहून पोलिसही हडबडले

या माथे फिरूने पोलिसांवर ही जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या शिताफीने पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतल्यानंतर सर्वानी सुटकेचा श्वास घेतला. 

Updated: Nov 13, 2022, 09:39 PM IST
हातात चामड्याचा पट्टा आणि.... डहाणूत फिरणाऱ्या माथेफिरुला पाहून पोलिसही हडबडले  title=

हर्षद पाटील, झी मीडिया, डहाणू :  डहाणू रेल्वे स्थानक(Dahanu Railway Station) परिसरात फिरणाऱ्या माथेफिरुमुळे(psycho man)  दहशत( thrilling act) माजली होती. हातात पट्टा आणि सुरा घेऊन हा माथेफिरु भर गर्दीत फिरत होता. या माथे फिरूने पोलिसांवर ही जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या शिताफीने पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतल्यानंतर सर्वानी सुटकेचा श्वास घेतला. 

या संपूर्ण घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास डहाणू रेल्वे स्थानकाजवळ भर गर्दीत एक माथे फिरू हातात सुरा आणि पट्टा घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होता. 

या माथेफिरूच्या भीतीमुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या काही बाईकस्वारांचे अपघातही झाले. यानंतर डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या माथेफिरूला पकडण्याचा प्रयत्न करताना याने पोलिसांवरही हल्ला चढवला . त्यानंतर या माथेफिरूला डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

डहाणू रेल्वे स्थानक परिसरात नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. या माथेफिरुमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. हा माथेफिरु कोण आहे? याचे नाव काय?  तो कुठे राहतो? याचा तपास पोलिस करत आहेत. मागील एक ते दोन दिवसांपासून तो रेल्वे स्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.