Shocking News : 3 वर्षाचं लेकरु 12 व्या मजल्यावरून खाली पडलं तरी आई - बापाला माहितच नाही; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवीन घरात ते मोठ्या आनंदाने शिफ्ट झाले होते. मात्र, मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने या माता पित्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Updated: Feb 27, 2023, 08:12 PM IST
Shocking News : 3 वर्षाचं लेकरु 12 व्या मजल्यावरून खाली पडलं तरी आई - बापाला माहितच नाही; नवी मुंबईतील धक्कादायक घटना title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : छोटीशी चुक देखील महागात पडू शकते. आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. 3 वर्षाचं लेकरु 12 व्या मजल्यावरून खाली पडलं तरी त्याच्या आई वडिलांना कळाले नाही. या घटनेत या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला आहे (Shocking News).  

नवी मुंबईतील उरण मधील द्रोणागिरी नोडमध्ये ही घटना घडलेय. येथील स्काय व्हिला या हायप्रोफाईल सोसायटीत हा प्रकार घडला आहे. या इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून  पडून शीवांश चव्हाण या तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवांशचे आई वडील या घरात राहण्यासाठी सामान शिफ्ट करत होते. आई वडिल दोघेही कामात व्यस्त असताना चिमुकला शिवांश बाल्कनी मध्ये गेला.

बाल्कनीच्या ग्रील मधून तो खाली बघत असताना त्याला तोल गेला. शिवांश थेट बाराव्या मजल्यावरुन खाली पडला.  सामान शिफ्ट करण्यात व्यस्त असलेल्या शिवांशच्या आई वडिलांना याची काहीच कल्पना नव्हती. शिवांश इमारतीतून  खाली पडल्यावर इतर रहिवांशी तसेच इमारतीच्या वॉचमनने धावत येवून त्यांना ही माहिती दिला.

ऐवढ्या उंचावरुन पडल्याने शिवांशचा मृत्यू झाला. मुलाला पाहून आई - वडिल दोघांना जबर धक्का बसला. त्यांनी तात्काळ शिवांशला रुग्णालयात नेले. परंतु त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयातच शिवांशच्या आईने टाहो फोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्या

लोणवळा येथील एक रिसॉर्टमध्ये दोन वर्षाच्या चिमुरड्याचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. या मुलाचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी त्याचे कुटुंबिय या रिसॉर्टमध्ये आले होते. विरार मधील जलतरण तलावात ८वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.