विषारी गॅस गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू

उल्हासनगर शहरातील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

Updated: Feb 16, 2018, 07:58 AM IST
विषारी गॅस गळतीमुळे एका कामगाराचा मृत्यू title=

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील शहाड परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत विषारी गॅस गळतीमुळे एका हंगामी कामगाराचा जागीच गुदमरून मृत्यू झाला.

तर ११ कामगारांच्या नाकातोंडात विषारी गॅस गेल्याने त्यांना कल्याणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

संजय शर्मा असं जागीच गुदमरून मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे. सेंच्युरी रेयॉन कंपनीत रात्री ९ च्या सुमारास गॅस पाईपलाईन दुरूस्तीचं काम सुरू होतं. त्यातून अचानक विषारी गॅसची गळती झाली. 

यावेळी कुठल्याही प्रकारची कंपनीच्या वतीने कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप कामगार आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. 

तर कंपनीच्या ठेकेदाराच्या माहितीनुसार त्याला चार दिवसाचे काम एका दिवसात पूर्ण करण्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.