Thane Station Viral Video: गेल्या महिनाभरापासून मुंबई (Mumbai Rain) आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं दिसतंय. सातत्याने रिमझिम सुरू असल्याने प्रवास करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलचा (Mumbai Local) प्रवास देखील त्रासदायक झाला आहे. काही लोकल सेवा बंद असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येतीये. अशातच आता ठाणे रेल्वे स्टेशनवर (Thane Station) धक्कादायक घटना घडली आहे. त्याचा व्हिडीओ (Viral Video) देखील आता समोर आला आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर ही घटना घडली.
सेंट्रल रेल्वेने (Central Railway) त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक प्रवाशी चालत्या रेल्वेमध्ये चढताना त्याचा पाय घसरतो आणि तो तोल बिघडून खाली पडतो. त्याचवेळी शेजारी असलेल्या दोन आयपीएफ (RPF staff ) कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला ओढून बाहेर खेचलं. त्यामुळे प्रवाश्याचा जीव वाचला आहे. त्याचा व्हि़डीओ (RPF staff saved Passenger) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.
ठाणे रेल्वे स्टेशनवर एलटीटी ते अयोध्या एक्स्प्रेसच्या (22183) बोर्डिंग दरम्यान एक प्रवाशी घसरत असताना ड्युटी आयपीएफ कर्मचारी सुमित पाल आणि सागर राठोड यांनी एका प्रवाशाला वाचवलं, अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, त्याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.
THANE Station PF no.7-
A passenger saved by on duty RPF staff Mr. Sumit Pal & Mr. Sagar Rathod, while he slipped during boarding 22183 LTT-Ayodhya exp at Thane.
He is given primary treatment in hospital, his condition is fine
Passengers are requested not to board running train pic.twitter.com/GEJqp57ZHx
— Central Railway (@Central_Railway) July 22, 2023
दरम्यान, प्रवाशावर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी धावत्या ट्रेनमध्ये चढू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलंय. मुंबईकडे जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाल्याचं समोर आलं होतं.