कल्याणमध्ये थरारक घटना, आईसमोरच 25 वर्षीय तरुणाचा 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला

कल्याणमध्ये अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने 11 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला केला आहे. 

Updated: Aug 16, 2023, 09:39 PM IST
कल्याणमध्ये थरारक घटना, आईसमोरच 25 वर्षीय तरुणाचा 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला title=

Kalyan Crime News: कल्याणमध्ये अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर भर रस्त्यात चाकूने सपासप वार करण्यात आले आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात अल्पवीयन मुलीचा मृत्यू झाला आहे. हल्ला करुन पळून जाणारा अल्पवयीन आरोपी नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. 

मृत मुलगी ही फक्त 11 वर्षांची आहे.  आदित्य कांबळे  (वय 25 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा चेतना नगर परिसरात राहणारा आहे. भरस्त्यात आरोपीने अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत मुलगी दुर्गा  दर्शन सोसायटीत राहत होती. मृत मुलगी आईसह घरी जात असताना सोसायटीच्या आवारातच हा प्रकार घडला. आई समोरच आरोपीने या 11 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक

आरोपी आकाश कांबळे या मुलीवर हल्ला करत असताना स्थानिकांनी पाहिले. स्थानिकांनी त्याला अडवले. मात्र, तो पर्यंत त्याने या मुलीवर सात ते आठ वार केले होते. स्थानिकांनी या आरोपीला पकडून त्याच्या हातातील चाकू हिसकावला आणि त्याला बेदम मार दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने या 11 वर्षीय मुलीची हत्या का केली? याचे कारण समोर आलेले नाही. 

मुलीचा मृत्यू

आकाश कांबळे यांनी 11 वर्षाच्या मुलीवर चाकूने सपासप वार केले. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली. मात्र, रुग्णाल.ात नेत असतानाच या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.   

कल्याणमध्ये एक दिवसाचे अर्भक मृतावस्थेत आढळले

कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर एक दिवसाचे अर्भक आज दुपारच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आले. याची माहिती नागरीकांनी पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुरुष जातीचे अर्भक ताब्यात घेऊन ते रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या ताब्यात दिले आहे. पोलिस या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे. मातृत्व लपविण्यासाठी कोणी तरी या अर्भकाला रस्त्यावर फेकून दिले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत. रुक्णीबाई रुग्णालय हे हाकेच्या अंतरावर असल्याने मृतावस्थेतील अर्भक मिळून आल्याने संशय अधिक बळावला आहे.