ही पिकअप फक्त हवेत उडायची बाकी होती का? पाहा व्हीडिओ

 हा थरारक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

Updated: Sep 3, 2021, 07:27 PM IST
 ही पिकअप फक्त हवेत उडायची बाकी होती का? पाहा व्हीडिओ title=

नाशिक : शेतमालाची वाहतूक करण्यासाठी तसेच मालवाहतुकीसाठी महिंद्रा पीकअपला (Mahindra Bolero Pickup Truck) प्राधान्य दिलं जातं. महिंद्रा पिकअप मोठ्या प्रमाणात वापरली जाते. अशीच एक महिंद्रा पीकअप रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मागच्या दोन चांकावर उभी राहिली. हा सर्व थरारक प्रकार नाशकातीसल (Nashik) सिन्नर तालुक्यातील डुबरेवाडी घडला. व्हीडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की ही पिकअप फक्त हवेत उडायचीच बाकी होती की काय? हा थरारक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. (A Mahindra Bolero pickup truck full of tomato carats stands on the front two wheels in Nashik)

नक्की काय झालं?  

महिंद्रा पिकअप टोमॅटोचे कॅरेट घेऊन जात होता. सध्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे पिकअप मागच्या दोन चाकांवर उभी राहिली. सुदैवाने यामध्ये कोणालाही काहीही झालं नाही. एकूण 2 तास हा सर्व थरार रंगला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला.