Shivaji Maharaj Statue : भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉर्डर टुरिझमची संकल्पना मांडली होती. त्या योजनेअंतर्गत छत्रपतींचा पुतळा भारत-पाक सीमेवर स्थापीत करण्यात आला आहे.
41 राष्ट्रीय रायफल मराठा एन. आय आणि आम्ही पुणेकर ही संस्था आणि त्यासाठी एकत्र आले आहेत. शत्रूशी लढणाऱ्या जवानांना महाराजांचा आदर्श, पराक्रम कायम डोळ्यासमोर रहावा यासाठी ही प्रतिकृती स्थापन करण्याची कल्पना पुढे आली.
जम्मू काश्मीर मध्ये, भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे काम पूर्ण झाल आहे.
7 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे. सुधीर मुनगंटीवार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकाला यावर्षी 350 वर्षे पूर्ण झाली. याच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती भारत-पाक सीमेवर स्थापीत होत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचा उर अभिमानाने भरून येणारा हा दिवस असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या पुतळ्याच्या लोकापर्णाबाबत माहिती दिली आहे. या पुतळ्याचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लंडनचं म्युझियम यांच्यात सामंजस्य करार झालाय.. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारच्या वतीनं करारावर स्वाक्षरी केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. शिवप्रेमींसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं लवकरच मुंबईला आणली जाणार आहेत..
ही वाघनखं नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. याच वाघनखांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदारांचा खात्मा केला, असा उल्लेख वाघनखांच्या या लाल पेटीवर आहे.